कणकवली (प्रतिनिधी ) :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र कणकवली अखत्यारीत दिगवळे परिमंडळ च्या वतीने लोकसहभागातून नरडवे गावातील अंबादेवी मंदिर परिसर व नरडवे गावातील मुख्य बस थांबे परिसरामध्ये साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने गावातील महिलांच्या बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमासाठी दिगवळे परिमंडळ मधील मा.वनपाल श्री ता.बा. दळवी वनरक्षक नरडवे श्री. प्र.रा. शिंदे वनरक्षक सु.कू. गळवे वनसेवक श्री. तू. म.रासम तसेच गावचे सरपंच श्री गणपत बाळकृष्ण सावंत माजी सरपंच श्रीम. सावंत तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.