कोट्यवधींच्या किंमतीची व्हेल माशाची उलटी केली वनविभागाच्या स्वाधीन

देवबागमधील गणेश तांडेल यांचा प्रामाणिकपणा

वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी तांडेल यांचे केले कौतुक

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवबाग संगम समुद्रकिनारी गणेश तांडेल यांना आढळून आलेला व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थ येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. सुमारे ७.९०० किलोग्रॅम वजनाचे हे गट्टे वनविभागाने ताब्यात घेतले असून हा नेमका काय पदार्थ आहे याच्या तपासणीसाठी नागपूर येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे अशी माहिती वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी दिली.

देवबाग मोबारवाडी येथे गणेश तांडेल हे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेले असता त्यांना व्हेल माशाच्या उलटी सदृश पदार्थ दिसून आला. याची माहिती वनपाल श्रीकृष्ण परीट यांना दिल्यानंतर त्यांनी तसेच पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

सुमारे ७,९०० किलोग्रॅम वजनाचे हे मेणासारखे गट्टे वनविभागाने ताब्यात घेतले. हा पदार्थ नेमका काय हे स्पष्ट होत नसल्याने ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे श्री. परीट यांनी स्पष्ट केले. श्री. परीट म्हणाले, व्हेल माशाला वन्यजीव अधिनियम १९७२ ने संरक्षित केलेले आहे. व्हेल माशाची शिकार करणे त्याच्या अवयवांची तस्करी करणे किंवा त्याचे अवयव स्वतःकडे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे तसेच यापूर्वीही काही मच्छीमाराना देवबाग येथे व्हेल मासा उलटी सदृशपदार्थ सापडला होता. तो त्यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला होता. देवबाग वासियांचे कायम वनविभागाला सहकार्य असते भविष्यात असे संशयित पदार्थ आढळल्यास वनविभागाला कळविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

व्हेल माशाच्या उलटीला अंबरग्रीस म्हणून ओळखले जाते. सुगंधी द्रव्यात त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या अबस्त्रीसला जगात मोठी मागणी आहे. अंबरग्रीसला समुद्रातील तरंगते सोने म्हटले जाते. गेल्या काही वर्षात तसेच काही महिन्यांपूर्वी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थ हा किनान्यावर वाहत येतो. यात आजच्या घटनेत मच्छीमारांनी प्रामाणिकपणे उलटी सदृश पदार्थ वनविभागाच्या ताब्यात देण्याचे काम केले

error: Content is protected !!