बिळवस येथे रस्ता खचल्यामुळे परिसर बनला धोकेदायक

चौके ( अमोल गोसावी ) : बिळवस येथील वरचावडा येथे भाई माधव यांच्या घरालगत रस्ता खचला असून धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली असून तेथील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरून गाड्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. याची लवकरात लवकर प्रशासनाने व ग्रामपंचायत कार्यालयाने दखल घेतली पाहिजे. बिळवस ग्रामपंचायत विभाजन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी अजूनही बिळवस गावामध्ये कोणताच विकास दिसत नाही योग्य त्या वेळी संरक्षण भिंत घातली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. उद्या सोमवारी बिळवस गावातील युवासेना पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तात्काळ काम करावे यासाठी निवेदन देणार आहेत असे युवासेना विभाग प्रमुख मसुरे राहूल सावंत यांनी सांगितले.

error: Content is protected !!