सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्राम पंचायत कारभारात अनियमितता तसेच दप्तर अपूर्ण ठेवणे, दप्तरात त्रुटी ठेवणे, अशा विविध प्रकारचा ठपका ठेवत कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी उमेश तुळशीदास खोबरेकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी निलंबित केले आहे. कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामविकास अधिकारी उमेश खोबरेकर निलंबित












