सावंतवाडी च्या कारट्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला

कणकवलीचे कारटे उल्लेख करत आ.नितेश राणेंवर खा. राउतांची बोचरी टीका

कणकवली (प्रतिनिधी): राज्याचे शिक्षणमंत्री झालेल्या सावंतवाडी च्या कारट्या दीपक केसरकर यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला. सिंधुदुर्गात सर्वात जास्त शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. आंतरजिल्हा शिक्षक बदली करून जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा बनवल्या.रिक्त जागांवर बेरोजगार डीएड उमेदवारांना नोकरीत घेण्याऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या या मिंध्या सरकारला गाडण्याची वेळ आली आहे. कणकवलीतील कारटे तृतीयपंथीयांना हिजडा म्हणते.हे कारटे ओवाळून टाकण्याची वेळ आली आहे अशी टीका आमदार नितेश राणेंचे नाव न घेता खासदार राऊत यांनी केली.

error: Content is protected !!