खा.विनायक राऊत यांनी संदेश पारकर ना दिल्या हटके शुभेच्छा
राज्यात चाटूगिरीचे सत्ताकारण- खा. राऊत यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी): मनाचा दिलदार माणूस म्हणजे संदेश पारकर होय. 14 जुलै म्हणजे केवळ संदेश पारकर यांचाच नव्हे तर सिंधुदुर्गातील समस्त शिवसैनिकांचा वाढदिवस असल्यासारखा उत्साह जिल्ह्यात असतो. अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर याना शुभेच्छा दिल्या.कुठलेही मोठे पक्षीय पद नाही की सत्ताधारी पक्षात नाही. तरीही संदेश पारकर यांच्यावर प्रेम करणारे अगदी दोडामार्ग पासून ते देवगड पर्यंत चे सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते जमा झालेत हे संदेश पारकर यांचे संचित आहे.ओसरगावचा अन्यायकारक टोलनाका पारकर यांच्यामुळेच सूरु होऊ शकला नाही. संदेश पारकर यांच्या लोकप्रियतेचा, कर्तृत्वाचा सन्मान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच करतील असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. राज्यात सध्या सत्तेचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी चे पितामह शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपा – मिंध्ये गटाच्या उरात धडकी भरली आहे. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या शरद पवारांवर टीका करणारे भाजपाचे चाटु झाले आहेत अशी टीकाही खा राऊत यांनी केली.











