आमदार वैभव नाईक यांचे खा.राऊत ,भास्कर जाधवांना आवाहन
कणकवली (प्रतिनिधी): संदेश पारकर हे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. पक्षकार्य करत असताना जनतेवरील अन्यायाविरोधात कायमच ते पेटून उठतात. संदेश भाईंचा वयाच्या 25 व्या वर्षी सरपंच असताना आम्ही सत्कार केला होता. संदेशभाईंवर महत्वाची जबाबदारी पक्षाने द्यावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी संदेश पारकर यांना वाढदिवस शुभेच्छा देताना केले. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संदेश पारकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा उद्योजक सुनील नारकर,राजू शेट्ये, अवधूत मालंडकर आदी उपस्थित होते.











