संघर्षाचे नाव संदेश पारकर – सतीश सावंत

कणकवली (प्रतिनिधी): कॉलेज जिवनापासून संदेश पारकर यांनी राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात केली. अन्यायाविरोधात पेटून उठणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही राजकीय पक्षात असले तरी सर्वपक्षीयांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व म्हणजे संदेश पारकर आहेत. त्यांच्या राजकीय मनोकामना पूर्ण होवो अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी संदेश पारकर याना शुभेच्छा दिल्या.शिवसेना नेते भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संदेश पारकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा उद्योजक सुनील नारकर,राजू शेट्ये, अवधूत मालंडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!