कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी घेतली दखल
फोंडाघाट (प्रतिनिधी): गटारांअभावी फोंडाघाट एसटी स्टँडवर गुडघाभर पाणी साचून प्रवाशांना त्रास होत असल्याच्या समस्येची सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी दखल घेतली . आज फोंडाघाट एसटी स्टँडवर पिडब्ल्यूडी कडून जेसीबी च्या साहाय्याने बुजलेली गटार खोदाई करण्यात आली. तसेच एसटी स्टँड लगतच्या बायपास रोडलगतही गटार खोदाई केली, जेणेकरून पाण्याचा निचरा नीट होऊ शकेल. एसटी स्टँडवरील बुजलेली गटार खोदाई केल्यामुळे पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊ शकेल.त्यामुळे एसटी स्टँड परिसरात पाणी साचून प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळणार आहे.












