शाळा कवठी नं.1 येथे शैक्षणिक साहित्य वितरण

कुडाळ ( अमोल गोसावी ) : गुरुवार दि. 13 जुलै रोजी शाळा कवठी नं. 1.येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.श्री. रविंद्र चव्हाण सर यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व मुलांना वह्या वितरित करण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून कवठी सरपंच श्रीम.स्वाती करलकर यांच्या सौजन्याने गावातील दोन्ही शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना ड्रॉइंग बुक, खडू, सुलेखन वही, पेन्सिल किट इ. तसेच शाळा कवठी नं.1 ला महाराष्ट्र नकाशा आणि हॅण्डवॉश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून .श्री रणजीत देसाई साहेब(माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष). श्रीम.स्वाती करलकर ( सरपंच कवठी) , श्री संदेश नाईक (माजी पं.स.सदस्य), श्री प्रमोद नाईक (माजी पं.स सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ) श्रीम. स्वाती राणे (ग्रामपंचायत सदस्य), श्री मनीष वाडयेकर (अध्यक्ष शा. व्यव.समिती), श्रीम. श्रीया योगी (उपाध्यक्ष शा.व्यव.) श्रीम.साक्षी जोशी (उपाध्यक्ष माता पालक संघ) श्री.अनिल बावकर (अध्यक्ष तंटामुक्ती समिती) श्रीम. वारंग मॅडम (मुख्याध्यापक शाळा कवठी नं.1) श्रीम. ऋतुजा मुणगेकर मॅडम (अंगणवाडी सेविका) श्री तुकाराम मेस्त्री(माजी उपसरपंच), श्री.एकनाथ बांदेकर (तज्ञ मार्गदर्शक श्री विठ्ठल राणे (पोलीस पाटील कवठी) श्री. रामचंद्र (दादा) करलकर, श्री.दत्तात्रय खडपकर (माजी ग्रामपंचायत सदस्य) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रणजीत देसाई यांनी गेल्या शैक्षणिक वर्षी आपल्या शाळेतील विजेची समस्या दूर करण्यासाठी स्वखर्चातून इन्व्हर्टर देण्याचे आश्वासन दिले होते. याची पूर्तता करण्यासाठी श्री.रणजीत देसाई सर यांनी आज इन्व्हर्टर खरेदीसाठी २०,००० (वीस हजार रुपये) देणगी देऊन वचनपूर्ती केली. या शैक्षणिक मदती बद्दल शाळेच्या वतीने सर्व दात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!