घोणसरी खवळेभाटले ते लोरे रस्त्यासाठी पालकमंत्री चव्हाण तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 30 लाख रुपये निधी मंजूर

माजी पं स सभापती तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांचा विशेष पाठपुरावा

फोंडाघाट (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील प्रजिमा ६ ते घोणसरी खवळेभाटले लोरे मार्ग ग्रा. मा.११८ रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व कणकवली पंचायत समिती चे माजी सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्या विशेष पाठपुराव्या मुळे या रस्त्यासाठी 30 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून घोणसरी खवलेभाटले वाडीतल्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच आमदार नितेश राणे व माजी सभापती मनोजज रावराणे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!