वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड करण्यात आली.सरपंच विलास नावले यांच्या अध्यक्षतेखाली आज लोरे ग्रा पं च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसभा पार पडली. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांचे नाव प्रमोद पांचाळ यांनी सुचविले. रितेश सुतार यांनी नराम यांच्या नावाला अनुमोदन दिले. मावळते तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेंद्र रावराणे यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम केल्याबद्दल सरपंच विलास नावले यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच नूतन अध्यक्ष नराम यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.आभार ग्रामसेवक कांबळे यांनी मानले.
लोरे नं 2 च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड












