तरंदळे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सरपंच सुधीर सावंत यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायतीची तहकूब झालेली ग्रामसभा सरपंच सुशिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती नेमण्यात आली. यावेळी तरंदळे गावचे माजी सरपंच सुधीर सावंत यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .तसेच उपाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार तयार झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबवून सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत माजी सदस्य भालचंद्र उर्फ देवा रावले यांची तंटामुक्ती उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवीन अध्यक्ष सुधीर सावंत व उपाध्यक्ष देवा रावले यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.तसेच मावळते तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंग नाईक यांनी कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले तसेच शाल श्रीफळ देऊन सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!