ओरोस (प्रतिनिधी) : एक लाखाची लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निलंबित एपीआय सागर खंडागळे यांची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी वाढीव पोलीस कोठडी सुनावली.3 दिवसांची पोलीस कोठडी ची मुदत संपल्यावर आज खंडागळे यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र अधिक तपासासाठी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.