रेकॉर्डवरील गुन्हेगारास पकडुन 1,00,000/- रुपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त-स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि 21-कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झालेने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. वरीष्ठांकडून प्राप्त झाले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार बालाजी पाटील व अशोक पोवार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याचेकडे चोरीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकल असून तो सदरची मोटर सायकल घेवून दि. 20मार्च2024 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जाणारे रोडवर असले टोल नाक्याजवळ येणार आहे. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथकाने नमुद ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे रफिक सलिम मुल्ला, व.व. 39, रा. गजानन महाराज मठासमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मुळ रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील चोरीचे काळे रंगाचे सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळालेले विना नंबरप्लेट मोटर सायकलबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमुद मोटर सायकल चोरीस गेलेबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 185/2024, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. त्यानंतर त्याचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने यापुर्वी चोरलेली व त्याचे खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील घराजवळ लावलेली आणखी विना नंबरप्लेटची स्प्लेंडर मोटर सायकल दाखविली. सदरची मोटर सायकल देखील चोरीची आढळून आली. एकूण 1,00,000/- रूपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त केल्या आहेत. नमुद आरोपीकडुन राजारामपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं. 185/2024 व विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली गु.र.नं.54/2024, भा.द.वि.स.क. 379 असे एकूण 02 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई करीता राजारामपुरी पोलीस ठाणे येथे जमा केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे-पाटील व श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार बालाजी पाटील, अशोक पोवार, वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, अमर आडूळकर व संतोष पाटील यांनी केली आहे.

error: Content is protected !!