कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,करवीर तालुक्यातील परिते येथे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक देवाळे इथं संपन्न झाली. यावेळी वाशी, पिरवाडी, कांडगाव, हळदी, कुई, करुकली कोथळी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू पाटील होते. यावेळी बोलताना, राष्ट्रीय काँग्रेसनं सार्वजनिक कंपन्या उभ्या करून देश उभा करण्याचं काम केल. आणि भारतीय जनता पक्षानं एकही संस्था उभी न करता आहे त्या कंपन्या विकून देश संपवण्याचं काम केल. अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी केल.
भारतीय जनता पक्षान एकही संस्था उभी न करता आहे त्या कंपन्या विकून देश संपवण्याचं काम केल — आमदार पी.एन.पाटील











