5 लाखांच्या अवैध दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली च्या पथकाची कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे चारचाकी वाहनामध्ये कांद्याच्या गोणींखाली लपवुन अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना वाहनासह अं. 10,08,000 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मनोज शेवरे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने बांदा ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे मालवाहतुकीचे बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-47-Y-1917 या वाहनाची तपासणी केली असता सदर मालवाहतुकीच्या वाहनाच्या हौद्यामध्ये कांद्याच्या गोणी भरलेल्या दिसुन आल्या. गोव्याहुन होणाऱ्या कांदा वाहतुकीबाबत संशय आल्याने सदर वाहनाची कसुन तपासणी केली असता सदर गोण्यांचे खाली लपवुन ठेवलेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 50 बॉक्स व बिअरचे 30 बॉक्स असा एकुण 80 बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी आरोपी नामे 1) धोडीराम लिंबाजी गायकवाड, वय 42 वर्षे, रा. कैलाश भवन, 243, घोडबंदर रोड, शिवसेना ऑफिस जवळ, मीरा रोड ईस्ट (घोडबंदर) ठाणे, मीरा रोड, महाराष्ट्र 101107 व आरोपी क्र. 2) विशाल मारुती पठारे, वय 43 वर्षे, रा. हनुमान टेकडी, चाळ नं. 8, विवानी इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (ई) मुंबई 400 063 यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु.5.47,200/- किंमतीचे मद्य, रु. 4,50,000/- किंमतीचे चारचाकी वाहन व रु 10,800/- किंमतीचा इतर मुद्देमाल असा एकुण अं. रु. 10,08,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, दिपक वायदंडे, जवान, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!