प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ;आमदार नितेश राणे

आधी ठाकरेंचे, मग पवार कुटुंब संजय राऊत ने फोडले

कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती दाखवलेला आहे. आणि त्याच्या सुरीवर लिहिलेलं आहे संजय राजाराम राऊत. परत शिक्कामोर्तब होतोय की, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सूर्याची पिसाळ हा संजय राजाराम राऊत आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. ते पत्रकारांशी बोलताना कणकवली येथे केली आहे.

पहिल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भांडण लावून ठाकरेंचं घर फोडलं. आणि तेव्हाही राज ठाकरेंच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊत ची गाडी फोडलेली. त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सगळे आमदार यांनी उठाव केला.की सगीवसेना वाचवा. तेव्हा त्या चाळीस च्या चाळीस आणि तेरा च्या तेरा खासदारांचा रोश हा संजय राजाराम राऊतवर होता. त्यांनी सांगितलं की याच माणसाने शिवसेना मध्ये आग लावली आणि त्यामुळे आम्हाला उठाव करायला लागला. नंतर शरद पवारांच्या घरामध्ये जेव्हा अजित पवार यांनी भूमिका घेतली तेव्हाही सगळ्याच्या सगळ्या रोश या संजय राजाराम राऊत वर आलेला आहे. आणि आता प्रकाश आंबेडकर आणि यानंतर जसं मी वारंवार बोलतोय तुम्ही माझा हा व्हिडीओ सेव्ह करून ठेवा की, काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे. उंबरठ्यावर उभे आहे. कुठलाही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे. आणि त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे. हे तुम्हाला त्यांच्याच तोंडाने ऐकायला भेटेल. म्हणजे खंजीर खुपसण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे. प्रत्येक बाबतीमध्ये हाच खरा आणि बाकी सगळे खोटारडे. म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान वाचवायचे आहे. आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरचे व्यक्ती आहेत. त्यांच्याच घरचा व्यक्तीला बोलत असेल की हा संजय राजाराम राऊत पाठीत खंजीर खुपसत आहे. मग संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करतोय. असा सवाल आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी ते बोलत होते.

खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा अपमान कोणी केला असेल तर तो संजय राजाराम राऊतनी केलेला आहे. त्याच्यावर मोर्तब आम्ही नाही, प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यापुढे उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे. की ज्या पद्धतीने मातोश्री चे महत्व कमी करत करत इथ पर्यंत आणलेलं आहे. यापुढे हम दो, हमारे दो हे एवढंच ठेवण्यापर्यंत संजय राजाराम राऊत यशस्वी होईल, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

अंबादास दानवे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मिळालेल्या माहितीनुसार अंबादास दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत. संघाच्या शाखेमध्ये जायचे असे माहिती देखील मिळालेली आहे. संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेला व्यक्ती संघातून आणि परिवारातून कधीही लांब जात नाही. असा अनुभव असल्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असेही आ. नितेश राणे म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले,चंद्रकांत खैरे ती सीट जिंकू शकत नाहीत. २०१९ ला त मोठ्या फरकाने पडले होते. गंज लागलेल्या शिक्क्याला वारंवार उद्धव ठाकरे वापरत आहेत. म्हणजे एवढं सिद्ध होत की, केवळ संजय राऊत ची पॅन्ट साफ करून नाही तर आदित्यचे पाय धरून लागणार आहेत, असा टोलाही श्री. राणे यांनी लगावला आहे.

आपल्या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाप्रमाणे आपण सगळे चालतो. आणि कायद्यापलीकडे आणि कायद्यापेक्षा मोठा हा कोणच नाही. मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा दुसरा कुठलाही व्यक्ती असो. जो न्याय सामान्य भारतीय नागरिकाला लागतो. तोच न्याय काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांना लागतो. सामान्य नागरिक अगर ३१ मार्च अनुसार जर आपल्या आपल्या पद्धतीने कर भरत असतील. नियम पळत असतील. तर काँग्रेस पक्ष हे काय इटली नाहीये. तुम्हाला सगळ्या सवलती मिळण्यासाठी, म्हणून तुम्हाला या भारतामध्ये नियम पाळायचे नसतील तर तुमच्यासाठी जेल चे दरवाजे उघडे आहेत. म्हणून जर काय काँग्रेसने केलंय तेच भरतायत त्यांच्या काळामध्ये असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.

बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना आ. राणे म्हणाले, अजून पर्यंत सागर बंगल्यावरून त्यांना फोन आला नाही. आणि बैठक झाली नाही. जसं प्रत्येक वादळ प्रत्येक वादळ शंभवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे. ते बच्चू कडू नावाच पण वादळ आमचा सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबू शकेल, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

सर्व पक्ष राहिले किती आता. त्यांच्यामध्ये केजरीवाल नाहीत, झारखंड चे मुख्यमंत्री नाहीत, लालूप्रसाद यादव नाहीत, ममता बॅनर्जी यांचा भरोसा नाही, अखिलेश यादव दुसऱ्या तोंडाने बोलतात. त्यामुळे त्यांच्या सर्व पक्षाचा अर्थ आता बदलावा लागेल, असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे. रामलीला मैदानावर कुठलीच रामलीला होणार नाही. ते सगळं रावणाचं घर झालेलं आहे. म्हणून त्या सभेला काही अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.

जो माणूस उद्धव ठाकरे यांचा होऊ शकला नाही. जो माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा होऊ शकला नाही. जो माणूस शरद पवार यांचा होऊ शकला नाही. जो माणूस स्वतःच्या घरचा होऊ शकला नाही. तो आंबेडकरांचा काय होणार.? असा सवालही आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तर ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे नावाचा प्राणी कधीच कोणाचा होऊ शकत नाही. सांगलीच्या जागेबाबत व्यवहार पूर्ण झाला का ? हा राजकीय विषय नाही, तर आर्थिक विषय आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावं, असा टोलाही आ. राणे यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काय दिवे लावले असे प्रश्न विचारण्यापेक्षा जरा गावागावात जाऊन विचारा, पहा आणि त्याच्या गावांमध्ये उजेड कसा आणलेला आहे. आणि त्या गावांचा विकास कसा केलेला आहे. वाटल्यास त्यांना ते पाहण्यासाठी बाईक वरून बसवून फिरवतो. तेव्हा दाखवू केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय दिवे लावले आहेत. कारण त्याच दिव्यांच्या जोरावर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विनायक राऊत निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवे नसते तर विनायक राऊत दिसले पण नसते. विरोधकांना भाजप विरुद्ध लढण्यासाठी मुद्दे नाहीत. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध उबाठा आहे. ही कोणाची वैयक्तिक निवडणूक नाही. म्हणून उबाठाच्या नेत्यांनी हिंमत असेल तर विकासावर चर्चा करावी. आम्ही केव्हाही तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक राणे विरुद्ध उबाठा करायला देणार नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध उबाठा अशी निवडणूक लढत होईल. तुम्ही कितीही प्रयत्न केलात आणि कितीही वेगवेगळे प्रश्न निर्माण केलात किंवा वैयक्तिक स्टेटमेंट दिले तरी त्याला आम्ही वैयक्तिक स्टेटमेंट देणार नाही, असेही आ. नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!