कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसह करणार निवडणूक प्रचार
मालवण (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी चे उमेदवार खा. विनायक राऊत हे आज मालवण तालूका दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे आपली मशाल निशाणी घरोघर पोचवण्यासाठी मालवण तालुक्यात मविआ च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 10 वाजता सुकळवाड, साडे दहा वाजता तिरवडे, सकाळी 11 : 30 वाजता पेंडूर, 12 वाजता चाफेखोल, 1 वाजता नांदरुख, दुपारी 3 वाजता तारकर्ली, सायंकाळी 4 वाजता सर्जेकोट, सायंकाळी 5 वाजता तोंडवळी, सायंकाळी 6 वाजता चिंदर, सायंकाळी 7 वाजता मठ बुद्रुक, रात्री 9 वाजता वडाचा पाट येथे उपस्थिती.