खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचा माजी विद्यार्थी कु.विहान प्रथमेश शिंदेयाच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला ५५५१/- रुपयाची देणगी व शैशणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेला माजी विद्यार्थी कै.कु.विहान प्रथमेश शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या वाढदिवशी कुटुंबियांच्या वतीने नुकतेच दि .२ मार्च २०२४ रोजी खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शैशणिक साहित्याचे वाटप तसेच ५५५१/- रुपयाची मदत शाळेला देणगी स्वरूपात देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तथा शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, मारुती मेस्त्री, तसेच कु.विहान शिंदे यांचे आजोबा विनायक तुकाराम शिंदे, सत्यवान तुकाराम शिंदे, आजी – स्नेहा सत्यवान शिंदे, वडील – प्रथमेश विनायक शिंदे व आई – प्रथीती प्रथमेश शिंदे कौटुंबिक सदस्य व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कै.विहान प्रथमेश शिंदे हा विद्यार्थी खारेपाटण बंदरवाडी येथील रहिवासी होता. व तो खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ मध्ये पहिलीच्या वर्गात शिकत होता. मात्र दुर्दैवाने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले होते. मात्र त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. नुकताच कै.विहान शिंदे याचा २ मार्च ला वाढदिवस होता. याचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबीय यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना केचपेन बॉक्स ड्रॉइंग वही, पेन व चॉकलेट इत्यादी वस्तूंचे वाटप केले. तर शाळेला कु.विहाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोख ५५५१/- रुपयाची देणगी देण्यात आली.

यावेळी शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने शाळेचा माजी विद्यार्थी कै. विहान शिंदे याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर शाळेच्या शिक्षिका श्रीम रेखा लांघी व मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शाळेचा विद्यार्थी कु.विहान याच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत श्रधाजली अर्पण केली. यावेळी शाळेच्या शिक्षिका रुपाली पारकर, अलका मोरे, आरती जेजोंन, अमृता ब्रम्हदंडे, अबिदा नाईक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!