सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या मैदानातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे ट्विट केले आहे. शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून किरण सामंत यांची प्रबळ दावेदारी होती. तशा हालचालीही सामंत यांच्याकडून सुरू होत्या. मात्र अचानक किरण सामंत यांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार 400 पार होण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार असे ट्विट त्यांनी केले. मात्र काही वेळानंतर आपल्या अकाउंट वरील हे ट्विट किरण सामंत यांनी डिलीट केल्याने नेमके काय घडतेय याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.