डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील इयत्ता ४ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या डॉ.ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ.ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध स्पर्धा परीक्षेत खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –

इयत्ता – ४ थी – कु.सांची संतोष पाटणकर, कु.अन्वी निशिकांत शिंदे, कु.काव्या सुभाष गायकवाड, सम्यक संदीप पाटणकर, सुप्रबुद्ध संदेश पाटणकर, असद रिजवान मालीम तर इयत्ता ७ वी चा विद्यार्थी सोहम संतोष लोकरे ही सर्व मुले परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालीत.

खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या शुभहस्ते नुकतेच या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी, रुपाली पारकर, अलका मोरे, आरती जेजोन,अमृता ब्रम्हदंडे, अबीदा नाईक आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. तर या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खारेपाटण जि.प.केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, गौरी शिंदे उपाध्यक्ष अण्णा तेली, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!