प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा नारायण राणे यांचा कुटील डाव – खासदार विनायक राऊत

रत्नागिरी हरचेरी – नाचणे जि प मतदारसंघात राऊतांचा झंझावात

रत्नागिरी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे आधीकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार दिनांक 25-04-2024 रोजी हरचेरी व नाचणे जिल्हापरिषद गटाचा मेळावा बालाजी मंगल कार्यालय, नाचणे, तालुका रत्नागिरी याठिकाणी संपन्न झाला.

याप्रसंगी मेळाव्याला संबोधित करताना विनायक राऊत यांनी सांगितले की त्यांनी कधीच सामंत कुटुंबियांचा अवमान केला नाही किंवा असंस्कृत, असंसदीय शब्दात त्यांचा उद्धार केला नाही परंतु भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी ते केलं. स्वतः राणे केंद्रात उद्योग खात्याशी निगडित असलेले खाते सांभाळत असताना रत्नागिरीत उद्योग-धंदे बंद झाले असे जेव्हा सांगतात तेव्हा ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निष्क्रियेतेवर बोट ठेवत आहेत असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

9 राजकीय हात्यांचा ज्यांच्यावर आरोप होतो अश्या व्यक्तीला भाजपने येथून उमेदवारी दिलीये आता आपण ठरवायचे आहे की अश्या व्यक्तीला आपण आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवणार का..? असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थितांना केला. आमचा विरोध हा प्रकल्प आणायला नाहीये परंतु कोकणाला उध्वस्त करणारे प्रकल्प आणि अश्या प्रकलपांच्या नावाखाली बकासुरी वृत्तीने बळकवण्यात येणाऱ्या जमिनीला आमचा विरोध आहे व तो कायम राहील असे ही त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचप्रमाणे जे राणे जमीन दिली नाही तर हातपाय तोडण्याची भाषा करतात त्यांना आम्ही येथे आहोत तोवर हे शक्य नाही असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सिडको आणि एनआरसी बाबत लोकांना जागृत केले तर राणे कुटुंबीय हे जाती धर्मात, द्वेष निर्माण करत आहेत, कौटुंबिक द्वेष निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अश्या प्रवृत्तीला रोखायचे असेल तर 7 मे ला मशाल चिन्हासमोरील बटण दाबण्याचे त्यांनी सर्वांना आव्हाण केले.

याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंडयाशेठ साळवी, राष्ट्रवादी चे बशीरभाई मुर्तूझा, काँग्रेस च्या न्याय व विधी शाखेच्या ऍड. अश्विनी आगाशे मॅडम, मुश्ताक मुल्ला, हरचेरी विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, शेखर घोसाळे,संजय पुनस्कर, प्रमोद शेरे, रिझवाना शेख, संजय साळवी, दुर्गेश साळवी, आबा घोसाळे आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!