खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार दि.२५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खारेपाटण येथील श्री देव कालभैरव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी पक्षाचे वॉरियर्स रमाकांत राऊत, रवींद्र शेट्ये, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवा प्रमुख सुकांत वरुणकर, तसेच कणकवली तालुका प्रमुख शरद वायगणकर उपतालूका प्रमुख मंगेश गुरव, सरिता राऊत, लियाकत काझी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सुधाकर ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण विभागातील प्रचाराचा शुभारंभ संयुक्तिक करण्यात आला.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, इस्माईल मुकादम, ग्रा.पं सदस्य गुरुप्रसाद शिंदे, भाजप कार्यकर्ते विजय देसाई, किशोर माळवदे, रफिक नाईक, वीरेंद्र चिके, कुरगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, चिंचवली सरपंच अशोक पाटील, संतोष रोडी, कुबल गुरुजी, मधुकर गुरव, विठ्ठल गुरव,शेखर शिंदे,शेखर कांबळे, सदानंद तावडे,उज्ज्वला चिके,साधना धुमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार, किरण कर्ले, जयदीप देसाई, प्रणय गुरसाळे, प्रमोद जाधव, संदीप सावंत, उदय बारस्कर, अरुण कर्ले, महेश राऊत, राजू राऊत आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण येथे आज खासदार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री देव कालभैरव मदिर व श्री देव रवळनाथ मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.खारेपाटण शहरात महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांचा प्रचार सर्व कार्यकर्ते मिळून करणार असल्याचे यावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख सूकांत वरूणकर व भाजप वॉरियर्स रमाकांत राऊत यांनी सांगितले

