वायगणी गावी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप सुपर वॉरियर्स – रमाकांत राऊत यांची उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे तथा भाजप पक्षाचे उमेदवार नामदार नारायण राणे यांच्या प्रचाराला देखील गावोगावी सुरवात करण्यात आली असून नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळील वायगणी या गावी भाजप पक्षाचे सुपर वॉरियर्स रमाकांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थित सुरवात करण्यात आली.

कणकवली तालुक्यातील वायगणी या गावातील ग्राम दैवत श्री देव आदिनाथ मंदिर येथून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा ग्रामस्थांच्या उपस्थित नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी वायगणी उपसरपंच प्रताप फाटक, संदीप सावंत, संतोष जाधव, माजी सरपंच दळवी, श्रीकृष्ण बाणे आदी भाजप पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रत्येक घरोघरीं जाऊन प्रचार करण्यात आला.

यावेळी भाजप सुपर वारियर्स रमाकांत राऊत यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला.व आपल्या हकाच्या उमेदवाराला गावच्या विकासासाठी तसेच कोकणच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन केले. यावेळी भाजप पदाधिकारी व माजी जि.प.सदस्य तथा बांधकाम व वित्त सभापती रविंद्र जठार, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी देखील या प्रचारा दरम्यान वायगणी गावला भेट देऊन प्रचाराचा आढावा घेतला.

error: Content is protected !!