दिव्यांग मतदाराच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण ; पियाळी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पियाळी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्रदिनी गावातील दिव्यांग मतदार ओंकार गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पियाळी ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. पियाळी गावातील दिव्यांग ग्रामस्थ तथा मतदार ओंकार गुरव यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. यावेळी पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच श्री संजय ढवण, ग्रा पं. सदस्य सौ तन्वी गुरव,ग्रामसेवक श्रीमती संगीता पाटील,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!