वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उप विभाग वैभववाडी शाखा भुईबावडा येथील प्रदान तंत्रज्ञ राजेंद्र सखाराम तांबे यांना यावर्षीचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 मे रोजी कामगार दिनी रत्नागिरी येथे हा पुरस्कार मुख्य अभियंता वीज वितरण कंपनी रत्नागिरी परिमडलं यांच्या हस्ते देण्यात आला.
वीज वितरण कंपनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचारांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन यंत्र चालक व विदयुत वाहिणीवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मे रोजी कामगार दिनी संबंधित परिमंडळाचे मुख्य अभियंता यांचे मार्फत उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यावर्षी हा पुरस्कार वैभववाडी उपविभाग शाखा भुईबावडा येथील प्रदान तंत्रज्ञ राजेंद्र तांबे यांना मिळाला आहे. तांबे हे नानीवडे गावचे सुपुत्र असून गेली पंचवीस वर्ष वैभववाडी तालुक्यात वीज वितरण कंपनी कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत वीज वितरण कंपनीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.












