खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या वायगणी या गावातील ताम्हणकरवाडी येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचा प्रचार भाजप पक्षाचे सुपर वॉरियर्स रमाकांत राऊत व शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत घर टू घर करण्यात आला.
यावेळी वायगणी सरपंच अस्मी लाड, उपसरपंच प्रताप फाटक माजी सरपंच कदम उपसरपंच संदीप सावंत, संदीप दळवी संतोष जाधव, ग्रा.पं.सदस्य शमिका सुतार, भारती परब, उज्वला लाड, वनिता सुतार,भाग्यश्री बाणे, संभाजी बाणे आदी मान्यवर पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वायगणी गावातील ताम्हणकरवाडी येथील ग्रामस्थांनी प्रचारात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. व महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांना भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचे यावेळी सांगितले.

















