जिल्हा प्रमुख -संदेश पारकर, उपतालुका प्रमुख-महेश कोळसुलकर माजी विभाग प्रमुख -दया कुडतरकर यांच्या उपस्थितीत प्रचार सुरु
खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराची खारेपाटण विभागात जोरदार सुरुवात झाली असून,खारेपाटण, शिडवणे, कुरंगवणे आदी गावातून मतदार व नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहे.तर मतदारांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पर्यंत शिवसेनेची नवीन मशाल निशाणी पोचवण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, उपतालुका प्रमुख-महेश कोळसुलकर,माजी विभाग प्रमुख -दया कुडतरकर याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार घरोघरीं जाऊन करीत आहेत.
खारेपाटण विभागातील प्रमुख गावातून आज शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी प्रमुख पदाधिकारी नागरिक व मतदारांच्या भेटी घेतल्या व महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राउत याना कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून द्या. असे आवाहन देखील यावेळी संदेश पारकर यांनी नागरिक मायबाप मतदारांना केले.














