जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा शाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा या उपक्रमांतर्गत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नुकताच मंगळवार दि.३० एप्रिल २०२४ रोजी शाळेत घेण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांच्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.

यावेळी इयत्ता सातवीतून इयत्ता आठवीत जाणाऱ्या कु.सृष्टी गजानन कोलते व सुयश दशरथ वाघरे इ.७ वी या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .तसेच जिल्हा परिषद शाळा चिंचवली मधलीवाडी येथे कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका योगिनी सुहास रानडे यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सूर्यकांत भालेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

तसेच स्वयंसेविका प्रियांका अनिल खोत यांचा देखील शाल व श्रीफळ तथा भेटवस्तू देऊन शाळा समितीच्या अध्यक्षा सौ.साक्षी श्रीकृष्ण भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड झालेले या शाळेचे उपशिक्षक अमोल विलास भंडारी यांचाही शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गजेंद्रसिंग पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिक्षक पालक संघ व माता पालक संघ संघाचे सन्मा. सदस्य व पालक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!