4 जून ला मशाल विझणार ; राज्यात महायुतीचे 45 खासदार जिंकणार
आमदार नितेश राणेंचा प्रहार
बारावीत राज्यात सर्वाधिक निकाल देणाऱ्या कोकणसह राज्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात कोकण पॅटर्न चा बोलबाला यावर्षीही राहिला असून राज्यात सर्वाधिक निकाल कोकण बोर्डाचा लागला आहे. कोकणसह राज्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पराभवाचा चेहरा म्हणजे काय असतो हे कालच्या उद्धव ठाकरे आणि आजच्या संजय राऊत च्या रडगाण्याने सिद्ध झाला आहे. 4 जून ला उबाठा चा पराभव होणार हे निश्चित असल्याने ठाकरे कुटुंबीय लंडन ला पळ काढणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली. ठाकरेंच्या नावाने लूक आउट नोटीस काढावी. राज्यात महायुती चे सगळे उमेदवार ठासून येणार आहेत.महायुतीचे 45 खासदार निवडून येणार आहेत. मतदारांनी मोदी आणि भाजपा सरकारला स्वीकारले आहे हे राज्यात झालेल्या मतदानानंतर दिसून आले आहे. संजय राऊत आणि त्याच्या मालकाने एकही जनतेतील निवडणूक लढवली नाही. गल्लीतील संजय राऊत सारख्या टिनपाट विश्लेषकाला काडीची किंमत जनतेने दिली नाही. 4 जून रोजी राज्यात मशाल विझलेली दिसून येईल. पुण्यातील दुर्घटनेनंतर पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. याचा समाचार घेताना जसे दिशा सलियान चे प्रकरण लपवले ते या प्रकरणात होणार नाही.महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांना घर गड्या सारखे वापरले, जे आता महायुती सरकारमध्ये होत नाही.गृहमंत्री फडणवीस आहेत. कोणालाही माफी मिळणार नाही. संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ भांडुप मध्ये बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. पण निवडणूक आयोग आणि आमच्या कार्यकर्त्यानी तो प्रयत्न हाणून पाडला.तौक्ते वादळात उद्धव ठाकरेंनी केलेली घोषणा आणि प्रत्यक्षात मिळालेली मदत यात असलेली तफावत बॅनर च्या द्वारे जनतेसमोर आणू .कणकवली तालुक्यात झालेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची तौक्ते वादळाप्रमाणे नुकसानभरपाई द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विरोधकांनी दिला आहे. यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. आम्ही स्वतः सिमेंट पत्रे आणि कौले नुकसान ग्रस्तांना घरपोच केले आहेत. तुम्ही कधी स्वतःच्या खिशात हात घालणार ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.