जानवली हिट अँड रन च्या गुन्ह्यात चालकाला जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : जानवली हिट अँड रन गुन्ह्यातील आरोपी ओंकार दशरथ कोरडे ( रा. पुणे ) याची 20 हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ऍड अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. 17 मे रोजी सकाळी साडे आठ वाजता मुंबई गोवा महामार्गावर जानवली बौद्धवाडी येथे आरोपी ओंकार याने आपल्या ताब्यातील कारने अनिल कदम यांना धडक देऊन पसार झाला होता. या अपघातात अनिल कदम मयत झाले होते. आरोपी ओंकार याला कणकवली पोलिसांनी पुणे येथून 23 मे रोजी अटक केली होती.आरोपी ओंकार याला कणकवली न्यायालयासमोर हजर करत पोलिसांनी 2 दिवस पोलीस कोठडी ची मागणी केली होती.पोलीस कोठडीच्या मागणीला आक्षेप घेत आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांनी आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी युक्तिवाद केला. आरोपी ओंकार याला तपासकामात हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आदी अटींवर 20 हजारांचा जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!