कळसुली हायस्कूल SSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली प्रशालेचा SSC बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला असून प्रशालेमधून एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम क्र.- कु. प्राची प्रमोद दळवी ९४. ६०%, द्वितीय क्र. – कु. तन्वी संतोष राऊळ ९३. ००%, तृतीय क्र. – कु. अजिंक्य संजय सुतार ९२. २०%.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष – सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस – विजय पांडुरंग सावंत, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – नामदेव घाडीगावकर, सदस्य – रजनीकांत बळीराम सावंत व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष – जयवंत घाडीगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – शिवाजी गुरव, मुख्याध्यापक – व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!