बदलीत विस्थापित शिक्षकांना न्याय द्या

शिक्षक समितीची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा अंतर्गत बदली सन २०१९ व सन २०२३ च्या प्रक्रियेत पाचव्या फेरीत व रँडम राउंड मधून बदली होऊन विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,सन २०१९ मध्ये झालेल्या बदली प्रक्रियेत पाचव्या फेरीत व रँडम राउंड फेरीत गेलेल्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावे लागले.पती पत्नी नोकरीस असलेली दांपत्ये एकमेकांपासून ७० ते ८० किमी दूर गेली आहेत. या बदली विस्थापितांत मोठ्या संख्येने महिला शिक्षकांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नुकतीच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविली परंतु यात समानीकरण राबविल्याने तसेच एका शाळेतील किमान सेवा ही अट लावल्याने बऱ्याच शिक्षकांना शाळा घेता आल्या नाहीत.

तरी अशा बदली इच्छुक व अन्याय झालेल्या शिक्षकांना पुन्हा एकदा बदलीची संधी द्यावी अशी आग्रही मागणी शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!