कणकवली (प्रतिनिधी) : वादी कणकवली यांचे मेहरबान दिवाणी न्यायाधीशांचे कोर्टात सदर मिळकतीतील वादीच्या कब्जा भोगवट्यास हरकत अडथळा करू नये व कोणत्याही स्वरूपाचे टाकीचे व इतर बांधकाम हे करू नये अशी अज्ञार्थी ताकीद मिळणे करिता दावा दाखल केलेला आहे सदर दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत प्रतिवादी क्रमांक एक सरपंच ग्रामपंचायत कुंभवडे यांनी सदर दावा मिळकतीमध्ये गट नंबर 61 मध्ये वादींच्या सामायिक यातील कब्जे वहिवाटीस स्वतः अगर वितरणमार्फत हरकत अगर अडथळा करू अथवा करू नये आणि दावा मिळकतीमध्ये पाण्याच्या टाकीचे अथवा कोणत्याही प्रकारचे कसलेही बांधकाम करू अथवा करू नये अशी दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत तूर्ता तूर्त ताकीद मिळणे करिता सदर दाव्याच्या कामी वादी यांनी अर्ज दाखल केलेला होता सरपंच सदरच्या अर्ज मेहरबान कोर्टासमोर गुणदोषावर चालून सदर दावा मिळकतीमध्ये वादीचा असलेला हक्क हितसंबंध वडिलोपार्जित जमीन मिळकत प्रतिवादी क्रमांक 1 याने जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी जमिनीचे खरेदीखत /बक्षीस पत्र सदर कायदेशीरपणे प्रक्रिया पूर्ण करून केलेले नाही खरेदीखत करताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही प्रतिवादी क्रमांक एक सरपंच यांचा खरेदी खतातील 1गुंठा मिळकती वरती स्वतंत्र ताबा नाही अशा सर्व गोष्टींचा विचार करून मेहरबान कोर्टाने सरपंच ग्रामपंचायत कुंभवडे तालुका वैभववाडी यांचे विरुद्ध गट नंबर 61 या जमीन मिळकतीमध्ये वादी सौ मीना जयप्रकाश कदम यांच्या सामायिकातील कब्जे वहिवाटीस हरकत अगर अडथळा करू अथवा करू नये व सदर मिळकतीमध्ये पाण्याच्या टाकीचे अथवा कोणतेही बांधकाम करू नये अशी दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत तूर्ता तूर्त ताकीद दिलेली आहे सदर दाव्याच्या कामी वादीच्या वतीने ॲड.श्वेतांबरी रजपूत यांनी काम पाहिले













