कणकवली (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटलं की कौटुंबिक मेजवानी , मित्रमंडळींसह केक कापून थोडीशी दंगामस्ती हे साहजिकच आहे. पण या सर्वाला फाटा देत वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमांत साजरा केला. अचित कदम हे मुळातच सोशल अँगल जपत माणुसकी धर्म पाळणारे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळेच आपल्या स्वभावाला साजेसा सामाजिक बंधिलकी जोपासत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवशी अचित कदम यांनी कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धश्रमाला तांदूळ, साखर तेल चहा पावडर, बिस्कीट भेट दिल्या. तसेच कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील संविता आश्रमास तांदूळ, मसाला, साबुदाणे, फरसाण आदी जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.यावेळी अचित कदम यांच्यासह दिविजा वृद्धाश्रम चे संदेश शेट्ये, संविता आश्रम चे संदीप परब तसेच सुभाष मालंडकर, सागर राणे, आनंद घाडीगांवकर, अनिकेत गुरव आदी उपस्थित होते.













