सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल

ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेमध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे तीने बटर फ्लाय व इतर प्रकरातही उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या या यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. अ्‌‌क्वॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ओरिसा राज्यात दुसरी राष्ट्रीय जलतरण रँकिंग चॅम्पियानशिप

स्पर्धा १० ते १३ जुन या कालावधीत पार पडली या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पूर्वा गावडे हिची महाराष्ट्र राज्यातून निवड होऊन तीने राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात दमदार कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉंझ मेडल पटकावले आहे तसेच २०० मीटर बटर फ्लाय मध्ये चौथा क्रमांक व ८०० मिटर फ्री स्टाईल मध्ये चौथा क्रमांक पटकवला आहे तिच्या या यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

पूर्वाने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत यश मिळविले असून आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे सध्या ती बारावीत शिकत असून पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधींनी येथे राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!