नाईकांनी आमदारकीची शेवटची घटका एन्जॉय करावी – समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत खा. नारायण राणेंना कणकवली शहराच्या इतिहासात नोंद होईल, १७१७ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळेच उबाठाचे नेते आ. वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना खुले चॅलेंज देवून देखील त्यांनी स्विकारले नाही. केवळ पत्रकार परिषदा घेवून मते मिळत नाहीत. त्यासाठी विकास करावा लागतो. कणकवली शहरातील जनतेने राणेंना भरभरुन मतदान केलेले आहे. त्याबद्दल मी आभार मानतो. तसेच नाईकांनी राऊतांना पाडण्याचे काम केले ते कोणाच्या संपर्कात होते, हे मला माहित नाही. पुढील काळात आ. वैभव नाईकांना शेवटचे २-३ महिने आमदारकी एन्जॉय करावी, असा उपरोधक टोला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लगावला.

कणकवली शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, बैंक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, बाळा पाटील, अभय राणे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, मेघा सावंत, अभिजित मुसळे, सदडेकर, प्राची कर्पे, परेश परब, चारुदत्त साटम, बंडू गांगण, गंगाधर सावंत, मिथुन ठाणेकर, राजन परब आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभेची निवडणूकीत शहरात खा. नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने भाजपाचे नगरसेवक, कणकवली शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांवर विश्वास जनतेने दाखवला. त्याबद्दल मी कणकवली शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त करतो. पूर्वीचा इतिहास काढला तर कणकवली शहरांमध्ये १७१७ असे लीड आज पर्यंत निवडणूकांमध्ये कुठच्याच उमेदवाराला मताधिक्य एवढे मिळालं नव्हतं. ते मताधिक्य राणेंवर विश्वास ठेवून, मोदी सरकारवर विश्वास ठेवून मिळाले आहे. त्यामुळे खा. नारायण राणे जवळपास ४० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

या निवडणूकीत माजी नगरसेवक, कणकवली शहराचे अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष, महिला लोकप्रतिनिधी, कणकवली शहरातील भाजपचे सर्व बूथ अध्यक्ष, शहरातील भाजपचे सर्व प्रेमींनी अतिशय प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीला काम करून त्यांनी १७१७ मते मिळवून दिल्याबद्दल त्याही पदाधिकान्यांचे आभार मानतो. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरांमध्ये जो या दोन अडीच वर्षात जो विकास झाला, दोन वर्षात त्या विकासाची पोचपावती म्हणून या मताधिक्य मिळाले आहे. त्याच्यामुळेच सर्वाधिक आनंदाची बातमी अशी आहे की जे वारंवार रोज पत्रकार परिषदा घ्यायचे, त्यांच्या चार तारीख नंतर पत्रकार परिषदा त्यांच्या बंद झाल्या आहेत. मताधिक्यासाठी विकास करावा लागतो आणि तो विकास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खा. नारायण राणे, पालकमंत्री आणि आमदार यांच्या माध्यमातून झाल्यामुळे हे मताधिक्य कणकवली शहरात जसे मिळालं तसे जिल्ह्यात मिळाले असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली शहरात बाजारपेठच्या बूथ वर तसेच बंडू हर्णे यांच्या बूथ वर आणि विठ्ठल देसाई, किशोर राणे यांच्या बूथ वर, तसेच टेंबवाडी बूथ वर चांगले मतदान भाजपला झाले आहे. असे समीर नलावडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!