आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिरास ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

धो धो कोसळणाऱ्या पावसातही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके (प्रतिनिधी) : आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त वराड ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.. सकाळ पासून कोसळणाऱ्या धो धो पावसाचा अडथळा झुगारून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरास उपस्थिती लावली. कोरोना काळापासून आज पर्यंत आभाळमाया ग्रुपचे हे १० वे रक्तदान शिबिर आहे.

या शिबिरास वराड गावच्या सरपंच सौ.शलाका समीर रावले, कट्टा गावचे सरपंच शेखर पेणकर, आंबेरी सरपंच मनोज डीचोलकर, वराड गावचे उपसरपंच श्री.गोपाळ परब, हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे, धक्का मित्रमंडळाचे भूषण पिसे, समाजसेवक सुनील नाईक, उद्योजक श्री.देवेन उर्फ पप्पू ढोलम, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख राजन माणगावकर, स्मिता कॉम्प्युटर इंस्टिट्यूटचे संचालिका श्रद्धा नाईक, डॉ.प्रथमेश वालावलकर, समाजसेवक अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि आभाळमाया ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी गावातील एक दिव्यांग नागरिक कु.योगेश परब यांना आभाळमाया ग्रुपतर्फे अपंगांची तीन चाकी सायकल देण्यात आली.

error: Content is protected !!