योग कार्यशाळा घेऊन सावंतवाडी वन विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा !

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आज जगभर सजऱ्या करण्यात येणाऱ्या अंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे संकल्पनेतून वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येत आज सकाळी विभागीय कार्यालय सभागृहात योग कार्यशाळा पार पाडली.

या कार्यशाळेसाठी योगप्रशिक्षक म्हणून पतंजली योगअभ्यासक व सावंतवाडी वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत असलेले संतोष मोरे हे लाभले होते. या योग कार्यशाळेच्या समारोपावेळी नवकिशोर रेड्डी यांनी आपल्या सर्व उपस्थित वन अधिकारी कर्मचारी यांना संदेश दिला की, शासकीय कामकाजाच्या रोजच्या तणावपूर्ण कामकाजामध्ये बऱ्याच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. योगसाधना हा सहज व सोप्पा उपाय आहे ज्याद्वारे आपण आपले शरीरिक व मानसिक आरोग्य उत्तम प्रकारे टिकवू शकतो व निरोगी जीवनमान जगू शकू. अशा निरोगी जीवनशैलीमुळे कार्यालयीन कामकाज व जबादाऱ्या पार पडताना देखील आपली कार्यक्षमता वाढलेली आपण नक्की अनुभवू शकतो. A healthy mind lies in a healthy Body. त्यामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी योगसाधनेचा पुरेपूर अवलंब करावा असा संदेश मा. उपवनसंरक्षक यांनी सर्वांना दिला. वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानून सदर कार्यशाळेची संगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!