कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली येथील मूळ रहिवासी व सध्या कलमठ येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका विजया वसंत कुलकर्णी(वय ९२)यांचे गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी बिबवणे, कुडाळ, कसवण, वाघेरी, रत्नागिरी, खेड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये कर्तव्य बजावताना ज्ञानदान करून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमठविला होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री तर ऍड.अक्षय कुलकर्णी यांच्या त्या आजी होत.











