खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दी.२२ जून २०२४ रोजी खारेपाटण भाजपा शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या सौजन्याने चिंचवली गावातील चिंचवली मधलीवाडी, कुरंगवणे भंडारवाडी आणि चिंचवली नं.१ या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच चिंचवली मधलीवाडी या जि.प.शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
खारेपाटण हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका योगिनी रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साठी योगिनी रानडे मॅडम यांच्या शुभहस्ते चिंचवली मधलीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
खाऊ वाटपाचा मुख्य कार्यक्रम चिंचवली मधलीवाडी या शाळेत संपन्न झाला.
याप्रसंगी भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी भालेकर, चिंचवली मधलीवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार, चिंचवली नं.१ शाळेचे मुख्याध्यापक अमोल तुपविहीरे, चिंचवली मधलीवाडी शाळेचे विषय शिक्षक रेखा डिसले, अजय गटकळ, उपशिक्षिका कुरणे, अंगणवाडी सेविका दीपिका सुतार, मदतनीस सुरेखा भालेकर, स्वयंपाकी दर्शना गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते चिंचवली मधलीवाडी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

















