साहेब लवकरच मंत्री व्हा

आमदार नितेश राणेंचे युवा उद्योजक अचित कदम यांच्याकडून वाढदिवशी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा आमदार, वरवडे गावचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त वरवडे गावचे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता अचित कदम यांनी ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन केले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमदारसाहेब आपल्याला मंत्रिपद मिळू दे अशा शब्दांत आपल्या सदिच्छा अचित कदम यांनी आमदार नितेश राणेंना दिल्या. यावेळी माजी सभापती प्रकाश सावंत, वरवडे सरपंच करुणा घाडीगांवकर, माजी उपसरपंच आनंद घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, सदा चव्हाण, सागर राणे, संकेत, राणे, पंकज मेस्त्री आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!