कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर व सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नसल्याचे महावितरणने स्पष्ट केलेय. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय, केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेत (आरडीएसएस) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व स्मार्ट मिटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतलेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल, असेही महावितरणकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्वसामान्य ग्राहकांची स्मार्ट मीटर पासून सुटका











