भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सत्कार
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024 उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण (१००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती राज्यात प्रथम आली आहे. याबद्दल भाजपा च्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल, पुष्पगुच्छ व रोख रक्कमेच पारितोषिक देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माजी सभापती घनश्याम उर्फ निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे बाजार उपसरपंच राजु दुधवडकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, मा.सरपंच प्रदिप प्रभु , बुथ प्रमुख गणपत माधव, ओबीसी सेल चे शरद मेस्त्री, सुधिर ठाकुर, ग्रा.पं.सदस्य सीमा सावंत, सुधिर पेडणेकर इत्यादी उपस्थित होते.