वेरली शाळेची उर्वी खराबी ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत !

मसूरे (प्रतिनिधी) : शासनाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून जि .प. पूर्ण प्रा .शाळा वेरलीची कु .उर्वी उमेश खराबी हिने मालवण तालुक्यातून ग्रामीण प्रभागातून तिसरा क्रमांक प्राप्त करत जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. त्याबद्दल वेरळ पंचक्रोशीत उर्वी खराबी व वेरली प्रशालेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वेरळ सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण पोयरेकर, उपाध्यक्ष सिल्व्हिया लोबो व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रशालेच्या माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका शुभदा रेडकर, गणेश रेडकर आदी मान्यवरांनी शाळेला भेट देऊन कु. उर्वी खराबी हिचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार, मार्गदर्शक शिक्षक उमेश खराबी, विमल खराबी व अविनाश उबाळे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय माने, वेरळ ग्रा .प्र.सदस्य, शाळेचे माजी शिक्षक, पालक, वेरळ ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी सुद्धा कुमारी उर्वीचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक धारपावर सर व सर्व शिक्षक यांनी ग्रामीण भागातील आपल्या या शाळेत यापुढेही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून प्रामाणिक मेहनत घेऊ असे आश्वस्त केले.

error: Content is protected !!