चौके (प्रतिनिधी) : जगातील दुःख दूर करण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या राजवैभवाचा आणि संसाराचा त्याग केला आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर तृष्णा हेच दुःखाचे कारण आहे हा सिध्दांत मांडला. जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग असे प्रतिपादन श्रामणेर संदेश डिकवलकर यांनी चौके सम्यक नगर येथे वर्षावास प्रबोधन कार्यक्रमात बोलताना केले भारतीय बौद्ध महासभा (राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर) जिल्हा सिंधुदुर्ग शाखा अंतर्गत वर्षावास प्रबोधन मालिका कार्यक्रमाचे आयोजन मालवण तालुका शाखेच्या वतीने चौके संमेक नगर येथील समाज मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौद्ध विधीकर्ता तसेच श्रामणेर संदेश डिकवलकर बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोकण विभाग उपाध्यक्ष सुधीर धामणकर, सदस्य बबन मालवणकर, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकुमार कासले, जिल्हा महासचिव आनंद धामापूरकर, जिल्हा संघटक संजय पाटील सुहास कदम, मालवण तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उपाध्यक्ष दुलाजी चौकेकर, सचिव गंगाधर कदम, सहसचिव दादू चौकेकर, महिला प्रतिनिधी डिकवलकर, सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर, नरेंद्र पेंडूरकर, सुधाकर माणगावकर, सुरेश परब, राकेश जाधव,आमडोसकर, गाव शाखा अध्यक्ष विष्णू चौकेकर, संजय चौकेकर, अनंत बाबाजी चौकेकर, अनंत महादेव चौकेकर, सागर धामापूरकर, नामदेव चौकेकर, रविंद्र जाधव आदी उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. डिकवलकर पुढे म्हणाले की बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. बुद्धांनी जो गृह त्याग केला त्यातून त्यांनी जगाला शांती अहिंसा मैत्री करुणा ही तत्वे अंगी करण्याच्या उपदेश केला भिक्कू संघाची निर्मिती करून संपूर्ण जगामध्ये हे तत्त्वज्ञान पोचविण्याचे कार्य केले. बुद्धांचे विचार समाज माणसांमध्ये पोचविण्यासाठी बौद्ध अनुयायाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी मनोगत व्यक्त करताना वर्षावास प्रबोधन मालिका सुरू करण्यामागचा हेतू विशद करताना सांगितले की बौद्ध काळामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करताना पावसाचे चार महिने भिक्कूंना फिरता येत नव्हते म्हणून एका ठिकाणी थांबून प्रबोधन केले जात होते त्या अनुषंगाने आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास प्रबोधन कार्यक्रम केले जातात.
यावेळी बबन मालवणकर यांनी यांनी मार्गदर्शन केले तर धामणकर आणि डिकवलकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा महासचिव आनंद कुमार धामापूरकर यांनी केले तर आभार गंगाधर कदम यांनी मानले. कार्यक्रमाला चौके सम्यक नगर गाव शाखेचे सभासद तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













