आभाळमाया ग्रुपचे पुन्हा एकदा दातृत्व; कॅन्सरग्रस्त रुग्णाला केली ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत.

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील नांदोस गावातील रावजी चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाची उपचारासाठी मदतीसाठीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या पोस्टचा संदर्भ घेऊन पूर्णतः निर्व्यसनी आणि एक सज्जन गृहस्थ असलेले कॅन्सर या दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडल्याची पूर्ण माहिती घेऊन त्याला आर्थिक मदतीचे आवाहन आभाळमाया ग्रुपतर्फे करण्यात आले होते. याला आभाळमाया ग्रुपमधील अनेक दानशूर व्यक्तींच्या प्रतिसाद लाभला प्रत्येकाने सढळहस्ते मदत करून जमा झालेली ५०,०००/- एवढी आर्थिक मदत रावजी चव्हाण यांना उपचार घेत असलेल्या ठिकाणी म्हणजे मिरज येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन देण्यात आली.

त्यावेळी ग्रुप सदस्य समीर रावले, जगदीश परब, महेश परब, श्रीकांत शिरसाट उपस्थित होते. रावजी चव्हाण यांना उपचारासाठी अजूनही आर्थिक मदतीची गरज असून समाजातील जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदत द्यावी असे आवाहन आभाळमाया ग्रुप संस्थापक राकेश डगरे यांनी केले आहे.
मदतीसाठी आवश्यक माहिती- Reshma Ravji, Chavan State Bank of India, Branch : Katta.
A/C 32586737652 – IFSC code : SBIN0012213 – Google pay : 9423273278

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!