मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप होणार
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. तपासणी नंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग मधून करणार असल्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले. माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरा मध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत ११० लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली. शिबिरा मध्ये मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या ११० पैकी ३४ जणांना मोतीबिंदू निष्पन्न झाले असून ग्रामपंचायत कलमठच्या वतीने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, गद्रे क्लिनिकचे डॉ अनिरुद्ध तेली, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, हेलन कांबळे, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख, अबा कोरगावकर,बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, प्रथमेश धुमाळे उपस्थित होते. शिबिर यशस्वितेसाठी मानसी पाटणे, स्वराज बिद्रे, साईश दळवी, लक्ष्मी देसाई खुशाल कोरगावकर, गणेश सावंत, रमेश चव्हाण, आशा सेविका विभावरी कांबळे, प्राची पवार, भावना चिंदरकर, अक्षता लाड,प्रभाकर सावंत यांनी मेहनत घेतली.














