शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांचा वाढदिवस शिवसेना शाखेत साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस कणकवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. आ. रवींद्र फाटक यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूर्त ठाणे येथील कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक हे आपलं वाढदिवस कर्मभूमी ठाणे साजरा करतात. श्रावण सोमवारी श्रीदेव कुणकेश्वर येथे सहकुटुंब पूजेसाठी आलेल्या आमदार फाटक यांनी कणकवली येथे शिवसेना शाखेला भेट दिली. त्यावेळी आमदार फाटक यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा खजिनदार भास्कर राणे, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, युवा सेना तालुकाप्रमुख निलेश तेली, युवा शिवसैनिक मेहुल धुमाळे, चिन्मय रावराणे, सरिता राऊत सुनील सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!